सुरळीच्या वड्या/रोल्स
साहित्य :-
- एक वाटी बेसन पीठ
- एक छोटी वाटी मैदा
- ताक
- कोथिंबीर
- नारळ
- मिरची पेस्ट
- तेल
- मीठ
- हळद,
- जिरं,
- मोहरी,
- पाणी.
सुरळीच्या वडीचे सारण
- प्रथम कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुऊन घ्यावीनंतर ती सुकत ठेवावी (पाणी निघून जाईल अशा पद्धतीने ठेवावी). कोथिंबीर सुके पर्यंत नारळ खवून घ्यावा.
- धुवून सुकवलेली कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी एका पसरट भांड्यात काढून घ्यावी, त्यात खवलेला नारळ टाकून खोवलेला नारळ आणि कोथिंबीर मिक्स करा.
- एका छोट्या कढईत थोडं तेल - जिरं - मोहरी - मिरची पेस्ट टाकून फोडणी बनवावी, नंतर गॅस बंद करावा .
- ती फोडणी पसरट भांड्यातील मिश्रणावर टाकून घ्यावी. त्यात थोडे मीठ टाकावे. (आपल्याला हवे असल्यास थोडे लिंबू पिळा) मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- आता सारण तयार झाले.
सुरळीच्या वड्याचं कव्हर
- आता सुरळीच्या वड्या चा कव्हर तयार करण्याअगोदर दोन मोठी ताटं उलटी ठेवून वरच्या बाजूला तेल थोडासा तेलाचा हात पसरावा.
- आता सुरळीच्या वडीचा कव्हर तयार करून घेऊ एका कढईत थोडसं तेल टाकून अगदी किंचीत सर टाकायचं,
- एका पातेल्यात एक ग्लास ताक घ्यावं त्यात बेसन पीठ मैदा टाकून घ्यावा ते एक सारखा करून घ्यावा. त्यात थोडं पाणी टाकाव थोडी पातळ अशी पेस्ट करून घ्यावी.
- त्यात थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ टाकावे कढई गरम झाले की त्यात हे मिश्रण टाकून घ्यावे आणि चांगले हलवत रहा (थोडं घट्टसर होईस्तोवर) एक वाफ येऊ द्यावी.
- ज्याप्रमाणे पाकाला जशी एक तार येते त्याप्रमाणे या पिठाला पण थोड्याप्रमाणात येतं ही मग आपल कव्हरच पिठ तयार झाला असं समजाव
- वाफाळलेले पीठ आपण त्या दोन टाटा अन्वर टाकून घ्यावं आणि एक सारखे पसरावे,
- त्यावर आपण तयार केलेला कोथिंबीर आणि नारळाचा चव (आपण जे सारण तयार केले त्याला चव असेही संबोधतात.) पसरून द्यावे
- नंतर सुरीने एक ते दीड इंचाचे रेषा मारून घ्याव्या अलगत हातानी सुरीने ते एकमेकांवर गोळा करत जावे आपण रोल करतो त्याप्रमाणे करावे फक्त एवढंच की अलगद हाताने करावे
- वड्या ह्या नाजूक असतात अलगत हाताने काम करावे आणि सपाटुलाचा वापर करून काढून घ्यावयत.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा